कायद्याने गुन्हा असूनही गर्भपात औषधांची सर्रास विक्री

दोन ते तीन हजारांपर्यंतची प्रिस्किप्शनशिवाय औषधे उपलब्ध
medicine
medicinesakal

पिंपरी : गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे गर्भपाताची औषध विक्री सर्रास नामांकित वेबसाइटवर व ऑनलाइन सुरू आहे. या बेकायदा औषधांच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नाही. औषध विक्री दुकानांमध्येही दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय सर्रास मिळत आहेत. गर्भधारणा असलेल्या स्त्रीला मोठी जोखीम होण्याचा धोका यातून होवू शकतो, असे स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले आहे. (PCMC News)

तरुण-तरुणींच्या हातून नकळत होणाऱ्या चुकांमधून महिलांना गर्भपाताची नाइलाजास्तव वेळ येत आहे. सोनोग्राफी करून छुप्या पद्धतीने गर्भपात करणे कायद्याने चुकीचे असल्याने गर्भपात औषधांच्या माध्यमातून गर्भपाताचा पर्याय महिला स्वीकारत आहेत. बऱ्याच अल्पवयीन मुलींचा यामध्ये समावेश आहे. गर्भपातासाठी काही मार्गदर्शक सूचनांचे अवलंबन करणे आवश्यक आहे. एमटीपी ॲक्टनुसार या औषधविक्रीला बंदी आहे. स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे महिला सर्रास घेत असल्याचे समोर आले आहे.

medicine
पुणे, पिंपरीकरांना खूशखबर, सोमवारपासून PMPच्या 1150 बस धावणार

चुकीच्या औषधांमुळे रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होण्याचा संभव आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे. आठ आठवड्यापर्यंतचा गर्भ असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतली जाऊ शकतात. परंतु, त्यापुढे ही औषधे घेणे सर्वात मोठी जबाबदारी आहे. यामध्ये औषधांची गुणवत्ता पडताळणी करणे गरजेचे आहे. त्याचबरेाबर ही औषधे घेण्याचे टप्पे व पद्धती माहीत असणे अत्यावश्यक आहे. यामुळे अर्धवट गर्भ राहण्याचा धोका जास्त उद्भवू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

medicine
पतंजलीची एजन्सी मिळवून देण्याच्या नावाखाली सहा लाखाची फसवणूक

ही औषधे ऑनलाइन मिळणे चुकीचे आहे. यावर बंदी येणे गरजेचे आहे. नांदेडमध्ये यापूर्वी कारवाई झाली आहे. आपल्याकडेही असा गैरप्रकार रोखला हवा. गर्भपातापुर्वी तपासण्या करणे आवश्यकच आहे. अन्यथा जिवाशी महिला खेळत आहेत.

- डॉ. राहुल वीर, वीर हॉस्पिटल, तापकीर चौक, काळेवाडी

या औषधांच्या विक्रीला बंदी आहे. असे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. पुणे विभागात दोन औषध विक्री दुकानांवर गुन्हे दाखल केले आहेत. तीन वर्षाची शिक्षा आहे.

- एस. बी. पाटील, सहायक आयुक्त, अन्न औषध प्रशासन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com