नाणे मावळात रानडुक्करांचा दोघांवर हल्ला; शेतीचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, त्यांच्याकडून ग्रामस्थांवर हल्ले होत आहेत.

करंजगाव (ता. मावळ) : अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, त्यांच्याकडून ग्रामस्थांवर हल्ले होत आहेत. शनिवारी (ता. 5) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या दोघांवर रानडुक्करांनी हल्ला केला. ही घटना नाणे गावच्या हद्दीत घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संदीप नामदेव वंजारी (वय 40) व लक्ष्मण हरिभाऊ सप्रे (वय 36) हे दोघेही शनिवारी सकाळी शेतात चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी नाणे गावच्या हद्दीत कामशेत-नाणे रस्त्याव रानडुक्करांनी अचानक येऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वंजारी यांच्या पायाला व सप्रे यांच्या डाव्या हाता-पायाला, पोटाला व कानाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ आंद्रे यांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच, वनविभागाला याविषयी माहिती दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या जखमींवर कामशेतमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत वनविभागाला कळवले असता, वनविभागाचे महेश पाटील यांनी कर्मचारी सारिका शेळके यांना घटनास्थळी पाठवून पाहणी केली. एकीकडे कोरोनाचे संकट, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांचा हल्ला. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याशिवाय वन्यप्राण्यांमुळे ऊसाचे नुकसानही होत आहे. त्यामुळे प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wild boar attacked on both in naane maval