esakal | मतदारांचे मतदार यादीमधील छायाचित्र अद्यावत करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Voter List

मतदारांचे मतदार यादीमधील छायाचित्र अद्यावत करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मतदार यादीत (Voter List) छायाचित्र (Photograph) नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी (अ. जा.) विधानसभा मतदारसंघाचे (Pimpri Vidhansabha Constituency) मतदार नोंदणी (Registration) अधिकारी यांनी दिली. (Will Update the Photographs of the Voters in the Voter List)

पिंपरी (अ. जा.) विधानसभा मतदार संघाच्या ३९९ यादी भागामधील १८ हजार २५६ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे या प्रस्तावित मतदारांच्या नावाची प्रसिद्धी मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या तीनही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांनी त्यांचे छायाचित्र रहिवास पुराव्यासह पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर २६, निगडी प्राधिकरण येथे समक्ष अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आठ दिवसांत जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.

loading image