
गेल्या ४ एप्रिल रोजी ही गर्भार महिला पोटात दुखत असल्याने प्रसुतीसाठी कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात दाखल झाली. तिला प्रसूती विभागात दाखल केले असता काळात रक्तदाब वाढतो म्हणून तो नियंत्रण करण्यासाठी उपचार सुरु केले. पण तिला पोटात दुखणे आणि श्वास घेण्यासह रक्तदाबाचाही त्रास सुरु झाला होता. ऑक्सिजन पातळी खालावली होती.
पिंपरी : पुणे - कात्रजमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आणि अवघ्या २४ तासात ती जग सोडून गेली. तिचा कोरोनोमुळे मृत्यू झाल्याने त्या चिमुकल्या जन्मतःच पोरक्या झाल्या आहेत. त्यांच्या डोक्यावरच आईचं छत्र हरपल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रसूत महिलेच्या मृत्यूने भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना वाढला, असे आरोग्य विभागाचे मत आहे.
गेल्या ४ एप्रिल रोजी ही गर्भार महिला पोटात दुखत असल्याने प्रसुतीसाठी कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात दाखल झाली. तिला प्रसूती विभागात दाखल केले असता काळात रक्तदाब वाढतो म्हणून तो नियंत्रण करण्यासाठी उपचार सुरु केले. पण तिला पोटात दुखणे आणि श्वास घेण्यासह रक्तदाबाचाही त्रास सुरु झाला होता. ऑक्सिजन पातळी खालावली होती. श्वास घ्यायला त्रास होत त्रास असल्याने तिची कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले. अॅन्टीजेन चाचणी केली. तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली. पण त्या दरम्यान ५ एप्रिल रोजी सिझेरियन करून दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.
दुकाने बंद केल्याने व्यापारी चिडले, दादरमध्ये कडक शब्दात निषेध
आज (ता.६)सकाळच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान गेल्या काही महिने शहरात कमी झालेला कोरोना पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे तिची कोणतीही प्रवासाची माहिती नाही. त्यामुळे तिला कोरोनाची लागण कशी झाली. याबाबत निश्चित कोणतीही माहिती नाही. मात्र तिच्या मृत्यूमुळे दोन जुळ्या मुलीच्या डोक्यावरचे आईच छत्र हरवले आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून दिवसाला २ हजार रुग्णसंख्या सापडत असल्याने आरोग्य विभाग धास्तावला आहे.
हेही वाचा ; अपक्ष आमदार ते गृहमंत्री, कसा आहे अनिल देशमुख यांचा राजकीय प्रवास?
याबाबत लेबर रूमच्या परिचारिका मंगल सुपे म्हणाल्या, त्या महिलेची बिकट परिस्थिती होती. प्रसूती केली नसती, तरी महिलेचा जीव धोक्यात होता. तिच्या बाळांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.’’