talegaon station chakan road accident
sakal
तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावर मोठ्या आकाराच्या (ओव्हरसाईझ) लोखंडी साहित्याने भरलेल्या ट्रेलरने पिकअप टेम्पोला ठोकरुन उलट्या दिशेला फरफटत नेल्यामुळे रविवारी (ता. ०७) उत्तर रात्री सव्वाबाराच्या सुमारास झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात पिकअप टेम्पोत बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला.तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये एका दांम्पत्यासह त्यांच्या पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे.