esakal | Video : पिंपरी-चिंचवडमध्ये बिगारी काम करणाऱ्या महिलांना आता याचं प्रशिक्षण...
sakal

बोलून बातमी शोधा

Video : पिंपरी-चिंचवडमध्ये बिगारी काम करणाऱ्या महिलांना आता याचं प्रशिक्षण...

माझ्या वाट्याला आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत असे वाटते. त्यामुळेच मला आता माझ्या मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे. गेली 15 वर्षे बिगारी काम करणाऱ्या आणि आता गवंडीकामाचे प्रशिक्षण घेणाऱ्या पिंपरी येथील लक्ष्मी लाल सांगत होत्या. 

Video : पिंपरी-चिंचवडमध्ये बिगारी काम करणाऱ्या महिलांना आता याचं प्रशिक्षण...

sakal_logo
By
अवधूत कुलकर्णी

पिंपरी : माझ्या वाट्याला आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत असे वाटते. त्यामुळेच मला आता माझ्या मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे. गेली 15 वर्षे बिगारी काम करणाऱ्या आणि आता गवंडीकामाचे प्रशिक्षण घेणाऱ्या पिंपरी येथील लक्ष्मी लाल सांगत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

लाल या गांधीनगर येथे राहतात. त्यांची दिवसाची कमाई फक्त 400 रुपये. मात्र, बदलत्या काळानुसार आता त्या गवंडीकामाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे कौशल्यावृद्धीबरोबरच त्यांच्या वेतनातही भरघोस वाढ झाली आहे. महिलांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दीपक मिस्त्री या महिलांना गवंडीकामाचे प्रशिक्षण देत आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत हे प्रशिक्षण पूर्ण होईल. सुरवातीच्या टप्प्यात 100 महिलांना अशा पद्धतीने प्रशिक्षित करण्यात येणार आहे. गवंडी कामाच्या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे. या प्रशिक्षणामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यात येत आहे. 

कुटुंब सुधारेल 

बिगारी काम करणाऱ्या अनेक महिलांचे पती मद्यपी आहेत. त्यामुळे मुळातच उत्पन्न कमी त्यात व्यसन. परिणामी कुटुंबाची आर्थिक उन्नती होत नाही. मुलांना चांगले शिक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्‍नही अशा बांधकाम कामगारांपुढे असतो. मात्र, या प्रशिक्षणामुळे आर्थिक उन्नती होऊन कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा सुधारेल, अशी भावना या महिलांच्या मनात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिला काय म्हणतात...

यासंदर्भात प्रशिक्षण घेणाऱ्या गोविंदअम्मा कोंकल (रा. गांधीनगर, पिंपरी, मूळच्या रायपूर, कर्नाटक) यांनी सांगितले, "मी आणि माझे पती दोघेही बिगारी काम करतो. या प्रशिक्षणामुळे माझ्यातील कौशल्य वाढणार आहे. त्यामुळे वेतनवाढ होऊन अधिक चांगले जीवन जगता येईल.'' 

अनिता कोरवान (रा. गांधीनगर, पिंपरी, मूळच्या तेलंगण) यांनी सांगितले, "माझी आयुष्यात बरीच स्वप्ने आहेत. मात्र, कमी वेतनामुळे ती पूर्ण करता येत नव्हती. वेतनवाढ झाल्यानंतर माझी स्वप्ने पूर्ण करता येतील.'' 

लक्ष्मी लाल यांनी सांगितले, "मला दोन मुले आणि दोन मुली आहेत. माझे पतीही बिगारी काम करतात. प्रशिक्षणामुळे पगार वाढला आहे. त्यामुळे मुलांना अधिक चांगले दर्जेदार शिक्षण देण्याचा मानस आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


बिगारी काम करणाऱ्या महिलांना गवंडी कामाचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर त्यांचा दिवसाचा पगार 400 रुपयांवरून एक हजार रुपये झाला आहे. परिणामी त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. चार तास बिगारी काम आणि चार तास गवंडीकामाचे प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. 

- जयंत शिंदे - अध्यक्ष, बांधकाम कामगार सेना