महिलेकडूनच महिलेची फसवणूक; निगडी प्राधिकरणातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

  • एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पिंपरी : भागीदारीत सलून व्यवसाय सुरू करून महिलेकडून 18 लाख 25 हजार रुपये घेतले. त्यानंतर व्यवसायातून मिळालेला मोबदला व घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काजल कैलास भोसले (रा. केशवनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीभा प्रवीण वाघ (वय 35, रा. नवी मुंबई) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार 10 जून 2019 ते 11 नोव्हेंबर 2020 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला. आरोपी काजल हिने फिर्यादी महिलेसोबत भागिदारीत सलून व्यवसाय सुरू केला. यासाठी करारनाम्याने फिर्यादीकडून अद्यापपर्यंत 18 लाख 25 हजार रुपये घेतले. त्यावर मिळणारा मोबदला हा फिर्यादीला न देता टाळाटाळ केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पैसे देत नाही, अशी धमकी दिली. ग्राहकांकडून घेतलेले पैसेही फिर्यादीच्या खात्यावर न टाकता आरोपीने तिच्या पतीच्या खात्यावर टाकले. दरम्यान, फिर्यादी तसेच लॅकमे लिव्हर कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी महिलेवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women cheating 18 lakh in saloon business at nigadi pradhikaran