
Women Farmers
Sakal
तळेगाव दाभाडे : आढले खुर्द येथे प्रकल्प संचालक ‘आत्मा’ पुणे व तालुका कृषी अधिकारी मावळ यांच्यातर्फे महिला शेतकऱ्यांची भातपीक उत्पादन तंत्रज्ञान शेतीशाळा राबविण्यात येत आहे.यामध्ये शेतीशाळा म्हणजे काय, भात पीक बियाणे निवड, भात बीजप्रक्रिया, गादी वाफ्यावर रोपवाटिका, चारसूत्री भात लागवडीसाठी दोरी तयार करणे, चारसूत्री लागवड व युरिया ब्रिकेटचा वापर, भात पीक परिसंस्था निरीक्षणे, संकल्पना, चित्रीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.