महिलांची मुलांच्या ऑनलाइन शाळांमुळे होते दुहेरी कसरत

ऑनलाइन शाळा घरून सुरू झाल्या. परंतु, घरातील रोजच्या कसरतींसह मुलांच्या ऑनलाइन अभ्यासाचीही डोकेदुखी वाढली आहे.
Online Study
Online StudySakal

पिंपरी - ऑनलाइन शाळा (Online School) घरून सुरू झाल्या. परंतु, घरातील रोजच्या कसरतींसह मुलांच्या (Child) ऑनलाइन अभ्यासाचीही (Study) डोकेदुखी वाढली आहे. आईचा किंवा बाबांचा मोबाईल (Mobile) त्यांच्या कामासाठी (Work) न राहता मुलांच्या अभ्यासासाठी वापरला जात असल्याने सगळाच बट्ट्याबोळ होत आहे. बऱ्याच महिला गृहिणी असल्याने मोबाईलवरून मुलांचा अभ्यास घेणे त्यांना क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे महिलाचं दररोजचं जगणं पुन्हा एकदा मुलांभोवती गुरफटून होमवर्ककडे वळालं आहे. परिणामी, महिलांची कौटुंबिक जबाबदारीसह मुलांच्या ऑनलाइन शाळांमुळे दुहेरी कसरत सुरू झालेली दिसत आहे. (Women Homework Child Online School Confusion)

शहरात पहिली ते बारावीपर्यंतच्या खासगी व महापालिकेच्या शाळा सुरू झाल्या. परंतु, मुलांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र मोबाईल नसल्याने अनेक पालकांची भंबेरी उडत आहे. सकाळी उठल्यापासून आई मुलांच्या मागे मोबाईल किंवा लॅपटॉप समोर बसण्यासाठी धावत आहे. विनाअंघोळीची किंवा ब्रश न करताच मुलांच्या शाळा सुरू होत आहेत.

Online Study
Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद

दरम्यान, मुले तास सुरू असताना पाणी पिणे किंवा लघुशंकेची कारणे देऊन वारंवार मोबाईल म्युट करत आहेत. तसेच, वडील किंवा किंवा आईच्या मोबाईलवर अधूनमधून कॉल येत असल्यानेही मुलांच्या अभ्यासाची लिंक तुटत आहे. त्यानंतर मोबाईल कनेक्ट होण्यासाठी वेळ लागतो, तर मध्येच नेटवर्कचा अडथळा निर्माण होतो. मोबाईलवर अभ्यास आला की, पालकांकडून नजरचुकीने राहून जात आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुलांचा अभ्यास अर्धवट झाल्याने शिक्षक किंवा पालकांशी सल्लामसलत सुरू असते.

शिक्षक म्हणतात...

तास सुरू असताना घरातील आवाज ऐकू येतो. मुलांची लिंक तुटते. मुलांना व्हिडिओ म्युट, अनम्युट करता येत नाही. सकाळी तीन ते चार तास आईलाच शिकावे लागते. त्यानंतर त्या मुलांकडून अभ्यास करून घेतात. मुलांनी सकाळी नाश्‍ता करून नीटनेटकं आवरून बसणे आवश्यक आहे. परंतु, मध्येच पालक मुलांना खाऊ घालतात.

Online Study
पुणे नाशिक महामार्गावर अपघात: पती, पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

माझा मुलगा सहावीत आहे. सकाळी उठून घरातच अभ्यास करण्यासाठी तो टाळाटाळ करतो, त्यामुळे लक्ष देणं खूप गरजेचं झालं आहे. मुलांना काहीच समजत नसल्याने ते शंकाही विचारत नाहीत. शाळेचे शुल्क न भरल्याने शाळा ॲपमधून रिमूव्ह करत आहेत. सध्या खासगी क्लास लावणेही कठीण झाले आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. क्लास सुरू असतानाही मुले गेम खेळतात. त्यामुळे शाळा लवकर सुरू होणं गरजेचं आहे.

- पवन गुंजाळ, पालक, इंद्रायणीनगर

एकदा मुलांना शाळेत सोडलं, की आम्ही निर्धास्त होत होतो. घरातील कामे आटोपून काही वेळ आराम मिळत होता. परंतु, आता घरातील कामे आणि नोकरी सांभाळून मुलांसाठी वेळ देणे अवघड झालं आहे. मुलांचं हवं तितकं अभ्यासाकडे लक्ष लागत नसल्याने आमची जबाबदारी वाढली आहे.

- मनीषा कान्हे, नोकरदार महिला, चिंचवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com