महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या; नग्नावस्थेत आढळले दोघांचे मृतदेह | Murder Suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder
महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या; नग्नावस्थेत आढळले दोघांचे मृतदेह

महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या; नग्नावस्थेत आढळले दोघांचे मृतदेह

पिंपरी - तरुणाने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले. हा प्रकार दिघी येथील एका लॉजवर उघडकीस आला.

प्रकाश महादेव ठोसर (वय २८, रा. अजंठानगर, चिंचवड) याने आत्महत्या केली. तर ३५ वर्षीय महिलेचा खून झाला आहे. पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश अविवाहित असून महिला विवाहित आहे. हे दोघेही दिघीतील मॅगझीन चौकातील एका लॉजवर आले होते. त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. यामध्ये प्रकाश याने महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी उघडकीस आली. दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top