#LockDown : यांच्या जिद्दीला तोड नाही; काय करताहेत, बघा...

रमेश मोरे
Saturday, 2 May 2020

लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर कुटुंबाची घालमेल सुरू आहे.

जुनी सांगवी : लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर कुटुंबाची घालमेल सुरू आहे. प्रशासन व सामाजिक संस्था मदत करित असले, तरी अनेक कष्टकरी वंचित आहेत. कुठे मदत पोचतेय, तर कुठे तोकडी पडत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कष्टकरी, असंघटीत कामगार, घरकामगार, लॉकडाउनमुळे मेटाकुटीस आला आहे. अशातच जुनी सांगवी येथील एका बांधकाम अपघातात उजवा हात गमावलेली करिआम्मा मात्र, कुणापुढे हात न पसरता कांदे, बटाटे विकून लॉकडाउनशी लढा देत आहे. शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीने शाळा शिकता आली नाही. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच करिअम्माला मोलमजुरी करावी लागली. काही वर्षांपूर्वी मोशी येथे एका बांधकाम साईटवर काम करताना विजेचा शॉक लागल्याने अपघातात त्यांना उजवा हात गमवावा लागला. 

वयाची त्रेचाळीशी गाठलेल्या करिआम्माला दोन मुले व दोन मुली आहेत. पती बांधकाम मजूर आहेत. या अपघातातून सावरत आजवर करिआम्मा उद्यानाबाहेर चणे-फुटाणे कुरकुरे, रानमेवा विकून कुटुंबाला हातभार लावायची. मात्र, लॉकडाउनमुळे हेही बंद झाल्याने हार न मानता त्या रस्त्याच्याकडेला बसून कांदे व बटाटे घेऊन जिद्दीने उभी आहे. मुळ कर्नाटकातून आलेली हे कुटुंब जुनी सांगवीतील मुळानदी किनारा परिसरात पत्राशेड चाळ झोपडीत वास्तव्यास आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'सकाळ'च्या माध्यमातून करिअम्माची माहिती मिळताच त्यांना मदतीसाठी सांगवीतील सामाजिक संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. यात येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन,ओम साई फाउंडेशन, सिझन सोशल वेल्फेअर ट्रस्ट, बालाजी प्रतिष्ठान राहिमाई प्रतिष्ठान जे.डी. ग्रुप, सांगवी परिसर महेश मंडळ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या संस्था, मंडळे गरजुंच्या मदतीसाठी जिवनावश्यक वस्तू गरजूंपर्यंत पोचवण्याचे सेवाकार्य परिसरात करत आहेत.तरीही करिअम्मासारख्या अनेक वंचित दुर्लक्षितांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a women selling vegitables in juni sangavi