ऑनलाइन शिक्षणाच्या काळात ग्रामीण भागातील 'त्या' बनल्या अभ्यासदूत 

रामदास वाडेकर
Sunday, 16 August 2020

ग्रामीण भागात ऑनलाइन शिकवण्याची गैरसोय केली दूर 

कामशेत (ता. मावळ) : कोरोनाच्या साथीचे सावट दिवसेंदिवस वाढत आहे. मार्चपासून सर्वच शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिकविण्याची पद्धत रूढ झाली आहे. पण ग्रामीण भागात ऑनलाइन शिकवण्याची गैरसोय होत आहे. यावर वाऊंड गावातील महिला पालकांनी पुढाकार घेतला. त्या दोघी या मुलांचे अभ्यासदूत बनल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत हा वर्ग सुरू आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शाळेचा पट 24 आहे. शाळेतील दोन्ही मुख्याध्यापिका अर्चना कदम व शिक्षिका नर्गिस मुजावर या दुसरी व चौथीच्या वर्गाचा ऑनलाइन अभ्यास घेतात. पण पहिली दुसरीच्या वर्गासाठी त्या पालक अगदी देवदूतासारख्या भेटल्या आहेत. निर्मला वीरकर पहिलीचा व अश्विनी लोहट दुसरीच्या मुलांना रोज स्वतः:च्या घरी बोलावून शिकवितात. मुलांचा अभ्यास व गृहपाठ घेतात. शाळेच्या शिक्षिका त्यांना रोज मार्गदर्शन करतात. आणि या दोघी आपले हे सामाजिक बांधिलकीचे कार्य अगदी मनापासून आवडीने करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षणाचे महत्त्व जाणवलेल्या या दोघींच्या कामाचे कौतुक सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गट शिक्षण अधिकारी मंगल ओव्हाळ, विस्तार अधिकारी इंदुमती महाजन यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women took the lead in educating children in rural areas in maval