बाई, किती हा 'नथीचा नखरा'; सोशल मीडियाचा हा नवा ट्रेंड तुम्हाला माहितीये का?

सुवर्णा नवले
Friday, 22 May 2020

- आठवणींना उजाळा देत महिलांचे स्टेट्‌स झाले पुन्हा अपडेट
 

पिंपरी : नटून-थटून काढलेला नऊवारी साडीतला अन्‌ लग्नातला ठसठशीत नथीवरचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'नथीचा नखरा' चॅलेंज ऍक्‍सेपटेड या हॅशटॅगखाली महिलांचे स्टेट्‌स अपडेट होऊन जुन्या-नवीन आठवणींना चांगलाच उजाळा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल मीडियावर दहा मैत्रिणींना हे चॅलेंज पाठवायचे आहे आणि ते स्वीकारल्यानंतर प्रत्येकीने एकमेकींच्या स्टेट्सला हे फोटो अपलोड करायचे आहेत. मग बेस्ट फोटो एकमेकींना शेअर करून कॉमेंट्‌स केल्या जात आहेत. जुने फोटो आणि बदललेला लुक पाहून कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. त्यामुळे महिला फोटो पाहण्यात चांगल्याच हरखून गेल्या आहेत. लॉकडाउनमध्ये वैतागलेल्या काही महिलांना अशा ट्रेंडी ऍक्‍टिविटीमधून आनंद मिळत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टिकटॉकवरही महिलांनी आगळ्यावेगळ्या नथीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यामुळे हा ट्रेंड अधिकच वाढत चालला आहे. ज्या महिलेकडे अथवा तरुणीकडे असे फोटो नाहीत त्यांनी लॉकडाउनमध्ये घरीच नटाफटा करून फोटो काढण्याची नामी संधी कमावली आहे. त्यामुळे व्हॉटसऍप ग्रुपवरही चांगलीच चर्चा रंगली आहे.

असेही 'नथीचा नखरा' जोक्‍स

नथीचा नखरा झाल्यावर आता नवऱ्यासोबत 'बळीचा बकरा' हे चॅलेंज सुद्धा येईल. तसेच 'आधार कार्डवरचा फोटो स्टेट्‌सला लावा नथीचा बाजूला ठेवा. त्याचबरोबर अशी ही बनवा-बनवी या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा नऊवारी साडीतला फोटो नेटिझन्सनी सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

का आहे नथीचे आकर्षण

नथ (नोज रिंग) हा पारंपरिक दागिना असला, तरी सौंदर्य खुलून दिसणारा व महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध आकारामधील आकर्षित नथ लग्न कार्यामध्ये आजही आवर्जून घातली जात आहे. त्यामध्ये मोती, कुंदन, खडे व सोने असे विविध प्रकारातील नथी आहेत. जोधा अकबर व बाजीराव मस्तानी या चित्रपटांपासूनही नथींचा ट्रेंड अधिक नव्याने समोर आला आहे. रॉयल कुंदन, सिंपल साउथ, आयडियल बिड्स, बेस गोल्ड, प्राचीन, क्‍लासिक, स्टडीड, सिम्पल जोधाबाई, लटकन, हूप अशा विविध लूकमधील नथींचे आपापल्या संस्कृतीप्रमाणे आजही महिलांमध्ये मोठे आकर्षण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens Nose ring challenge trending on social media