esakal | पैशांसाठी 'टॉर्चर' केल्याने कामगाराची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

A worker has committed suicide by jumping from a building after being tortured for money at Rahatni

ही घटना रहाटणी येथे घडली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

पैशांसाठी 'टॉर्चर' केल्याने कामगाराची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : बॅंकेत भरण्यासाठी दिलेले पैसे कामगाराने वैयक्तिक कारणासाठी वापरले. या कारणावरून दुकानदारासह तिघांनी मिळून कामगाराला मारहाण व शिवीगाळ करीत 'तुझी जिंदगी खराब करून टकीन' अशी धमकी दिली. त्यानंतरही पैशावरून वारंवार त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून कामगाराने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे घडली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

हे ही वाचा : पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

गणपत मगाराम चौधरी (वय 28, रा. बालाज ट्रेडर्स, रहाटणी, मूळ-जोधपूर, राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गाराम मगाराम चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमान किर्तीराम चौधरी (वय 40), गणेशाराम बिडदाराम लोळ (वय 29), पप्पूराम मुलाराम डोगीयाल (वय 26, तिघेही रा, रा. लिगसी ओरा सोसायटी, रहाटणीगाव) यांना अटक केली असून शम्बुदेवी चौधरी या आरोपीवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी यांचे भाऊ गणपत चौधरी हे आरोपींच्या बालाज ट्रेडर्स या दुकानात मागील दोन वर्षांपासून कामाला होते. 12 नोव्हेंबरला आरोपी हनुमान चौधरी याने ६० हजारांची रक्कम गणपत यांच्याकडे देऊन ही रक्कम दुकानाच्या बॅंक खात्यावर भरण्यास सांगितली होती. 


हे ही वाचा : पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र, गणपत यांनी ती रक्कम बॅंक खात्यावर न भरता त्यांनी पूर्वी उधारीवर घेतलेल्या जोधपूर येथील एका सराफाच्या खात्यावर 49 हजार रूपये व त्यांचा भाऊ भगाराम यांच्या खात्यावर 11 हजार रूपये पाठविले. ही बाब आरोपींना समजताच त्यांनी गणपत यांना दुकानात बोलावून शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. 'तू आमचे पैसे परत केले नाहीस तर तुझी जिंदगी खराब करून टाकीन' अशी धमकी दिली. तसेच त्यानंतरही आरोपींनी पैशाच्या कारणावरून त्यांच्या घरामध्ये गणपत यांना त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गणपत यांनी रहाटणीतील लिगसा औरा सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 

दरम्यान, गणपत यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले