esakal | पोलिस भरतीसाठी २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पोलिस भरतीसाठी २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस (Police)आयुक्तालयांतर्गत ७२० जागासाठी येत्या २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा होणार आहे. शहरातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पहिल्या टप्प्यातील ७२० जागासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. यासाठीची लेखी परीक्षा २३ ऑक्टोबरला दुपारी ३ ते साडेचार या वेळेत होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

हेही वाचा: पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी पाच ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा

पोलिस शिपाई पदाच्या जागांमध्ये सर्वसाधारण - १७६, महिला - २१६, खेळाडू - ३८, प्रकल्पग्रस्त - ३८, भूकंपग्रस्त - १४, माजी सैनिक - १०७, अंशकालीन पदवीधर - ७१ पोलिस पाल्य - २२, गृहरक्षक दल - ३८ इतक्या जागांचा समावेश आहे.

loading image
go to top