पिंपरी : राजभवन सन्मानापासून वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांना ठेवले वंचित

आशा साळवी
Sunday, 11 October 2020

वैद्यकीय विभागाचा निष्काळजीपणा; नावे पाठविले नाही 

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काम करणाऱ्या डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांची राजभवन सत्कारास महापालिकेच्या वैद्यकीय विभाग आणि वायसीएम रुग्णालयातील वरिष्ठांनी नावे पाठविले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. परिणामी, वायसीएम रुग्णालयात अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते होणाऱ्या सत्कारापासून दूर राहावे लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोविडच्या महामारीत वायसीएम रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते 15 ऑक्‍टोबरला राजभवन मुंबई येथे सत्कार होणार आहे. त्या कर्मचाऱ्यांची नावे पाठविण्याचे आदेश दिले होते. राज्यातील सर्वच विभागांना या पुरस्कारामध्ये प्रतिनिधित्व दिले आहे. मात्र, जाहीर केलेल्या नावांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या एकाही कर्मचाऱ्यांचे नाव नाही. परिणामी वायसीएमच्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'वर्धापनदिनी यथोचित सत्कार करा' 

वायसीएममध्ये डॉक्‍टर, परिचारिका, पॅरामेडिकल्स जिवावर उधार होऊन काम करीत आहेत. त्यापैकी काहींना कोरोनाची बाधाही झाली. काहींना जीव गमवावा लागला आहे. म्हणूनच "कोविड योद्धा' म्हणून महापालिका वर्धापनदिनाचे औचित्य साधून यथोचित सन्मान करावा, अशी मागणी सोशल वर्कर महादेव बोत्रे, विजय मुंडे, वैभव देवकर, गणेश खत्री, शलमाने मिसाळ, रमेश चोखे आदींनी महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: YCM hospital deprived doctors of honor of Raj Bhavan