esakal | भोसरीत तरुणावर धारदार हत्याराने वार 
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत तरुणावर धारदार हत्याराने वार 

दोन महिन्यांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना भोसरीतील बालाजीनगर येथे घडली.

भोसरीत तरुणावर धारदार हत्याराने वार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. ही घटना भोसरीतील बालाजीनगर येथे घडली. 
बंटी ऊर्फ राजकुमार अभिमन्यू थोरात (वय 21, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खाजु तुराब सैय्यद (रा. बालाजीनगर झोपडपट्टी) यांनी फिर्याद दिली असून, दोघेही एकाच वस्तीत राहायला आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी (ता. 25) दुपारी पावणे तीनच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांना 'तू दोन महिन्यांपूर्वी शिवीगाळ का केली? माझ्या वडिलांना का मारले?', असे विचारले. त्यावेळी फिर्यादी हे समजावून सांगत असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. त्यावर 'तू शिवीगाळ का करतो?', असे फिर्यादी हे आरोपीला म्हणताच आरोपीने त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. रस्त्यावर पडलेला दगड मारत धारदार हत्याराने त्यांच्या डोक्‍यात वार केला. यामध्ये ते जखमी झाले. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.