esakal | लग्नास होकार न मिळाल्याने तरूणाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

लग्नास होकार न मिळाल्याने तरूणाची आत्महत्या

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - लग्नासाठी (Marriage) मुलीच्या वडिलांनी (Father) स्पष्ट होकार (Agree) अथवा नकार न दिल्याने तरुणाने (Youth) मोबाईलमध्ये (Mobile) ऑडिओ रेकॉर्डिंग (Audio Recording) करून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना हिंजवडी (Hinjewadi) येथे घडली. (Young Man Commits Suicide by not Agreeing to Marriage)

गणेश विक्रम खराडे (वय ३२), उमेश विक्रम खराडे (वय ३४, दोघे रा. मारुंजी), तुकाराम खंडू उदमले (वय ५१, रा. चोंढी, ता. जामखेड, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर अक्षय खराडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लता पंजाब खराडे (वय ४७, रा. काळाखडक, वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा व आरोपी तुकाराम उदमले यांची मुलगी यांचा विवाह करण्याचे नियोजित होते.

हेही वाचा: दिलासा! पुण्यात मृत्यूदरात घट, पिंपरी आज शून्य मृत्यू

मात्र, तुकाराम यांनी त्यांची मुलगी फिर्यादी यांच्या मुलाला देऊ नये म्हणून आरोपी गणेश व उमेश यांनी फिर्यादी यांचा मुलगा व्यसनी आहे. त्याची संगत चांगल्या मुलासोबत नाही. तो फालतू आहे, असे सांगून तुकाराम यांची दिशाभूल केली. तुकाराम यांनी खातरजमा न करता लग्नास स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही. फिर्यादी यांना केवळ आशेवर ठेवले. याच कारणावरून फिर्यादी यांच्या मुलाने २४ एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता येळवंडे वस्ती येथील रॉयल हॉटेल येथे छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवला. त्यामध्ये आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे.

loading image