
पिंपरी : निगडी-प्राधिकरणात राहणाऱ्या आयटी मेकॅनिकल इंजिनिअरिग युवकाने नुकताच एक लाख किलोमीटर सायकल राइडचा टप्पा पूर्ण केला. नोकरीच्या धावपळीतून स्वत:साठी झोकून देऊन 2004 पासून त्याने सायकल चालविण्याचा चंग बांधला. रनिंग व सायकल ऍप्लिकेशनही उपलब्ध नव्हते, तेव्हापासून रेकॉर्डची नोंद करुन ठेवली. महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सायकल राइड करुन स्वप्न प्रत्यक्षात उतरविले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लहानपणापासूनच गजानन शिवाजी खैरे यांना व्यायामाची आवड. इंजिनिरिंगची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी स्वप्नवत प्रवासाला सुरुवात केली. आजतागायत ते अविरतपणे जपले. या काळामध्ये अनेक व्यायाम प्रकाराला त्यांनी प्राधान्य दिले. त्यात जिम, धावणे, चालणे, पोहणे आणि ट्रेकिंग हे सर्व असायचे. त्यातल्या त्यात नियमितपणे दररोज चालणे सोडले नाही. त्यावेळी विविध प्रकारची मोबाईल ऍप्लिकेशन नव्हते. 'एन्डो मोंडो' या ऍप्लिकेशनमध्ये सर्व व्यायाम प्रकारांची नोंद नंतर त्यांनी केली. दर आठवड्याला घोराडेश्वर येथे ट्रेकिंग सुरू केले. त्यानंतर कामाच्या ठिकाणी उत्साही मित्र मिळाल्याने पोहणेही सुरू ठेवले. मात्र, सायकल चालविण्याचा छंद सोडला नाही.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
व्यायामाला जोड म्हणून निगडी ते पुणे विद्यापीठ असा सायकल प्रवास सुरू ठेवला. अजित पाटील, गणेश भुजबळ हे देखील मित्र जोडले गेले. मुंबई-पुणे महामार्गाला पहिली सोलो सायकल राइड त्यांनी पूर्ण झाली. दररोजची राइड सोमाटणे फाट्यापर्यंत असे. त्यानंतर व्हाट्सऍप ग्रुप केले. सर्व राइडची माहिती मित्रमंडळींना व नातेवाइकांना मिळाल्याने अनेकजण जोडले गेले. पहिल्यांदा फारच कमी लोक सायकलिंग करायचे, जशी-जशी लोकांना माहिती मिळत गेली तसतसे अनेक जण जोडून तीनशेच्यावर ग्रुप तयार झाला. तळेगाव, वडगाव, कान्हे फाटा, कामशेतपर्यंतची राइड लोणावळ्यापर्यंत गेली. लोणावळा राइड हि पहिली शतकी राइड ठरली. तीच राइड पुढे खंडाळ्यापर्यंत गेली. बऱ्याच मोठ्या संख्येने अनेकजण सायकलिस्ट लोणावळा ग्राउंड झिरोपर्यंत सर्रास सायकलिंग करीत आहेत.
विविध ठिकाणी केलेल्या राइड
पुणे ते सातारा, पुणे ते गोवा, जम्मू ते पुणे, पुणे ते अलिबाग (सोलो राइड), पुणे ते कन्याकुमारी, गोवा सागरी मार्ग राइड, पुणे ते दिवेआगर, पुणे ते ताम्हिणी घाट, पुणे ते काशीद बीच (सोलो राइड).
सर्व राइड्समधून खूप काही शिकायला मिळाले. वेगवेगळ्या प्रकारचे आणि विविध परिस्थितीमधील असंख्य सकारात्मक अनुभव पुढच्या वाटचालीसाठी कामी येतील. लॉर्डसला क्रिकेटची पंढरी म्हणतो तसेच लोणावळा ग्राऊंड झिरो म्हणजे आपल्या सायकल स्वारांची पंढरी झाली आहे. सायकल ट्रॅक शहरात विकसित होणे गरजेचे आहे. इंडो ऍथलेटिक सोसायटीच्या माध्यमातून अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होता येते. कोणतेही व्यावसायिककरण हे आमचे ध्येय नाही.
- गजानन खैरे, सायकलपटू