
प्लाझ्मादानात तरुणाईच आघाडीवर
पिंपरी - प्लाझ्मामुळे (Plasma) अनेक रुग्णांना (Patient) मदत (Help) झाली. बऱ्याच जणांची कुटुंबे प्लाझ्मा वेळेत मिळाल्याने सुखरूप राहिली. रक्ताचे नाते नसतानाही प्लाझ्मा दात्यांसाठी शोधाशोध (Searching) करून सर्व एकमेकांसाठी धावून आले. मात्र, यामध्ये तरुणाईचे (Youth) प्रमाण सर्वाधिक होते. सात मे २०२१ पर्यंत शहरातून वीस ते तीस वयोगटातील ३४ टक्के व तीस ते चाळीस वयोगटातील ४१ टक्के युवक-युवतींनी प्लाझ्मादान करून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. (Youth Forefront in Plasma Donate)
पिंपरी-चिंचवड यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) रक्तपेढीत गेल्या वर्षभरापासून प्लाझ्मा दात्यांची धावपळ सुरू आहे. कुटुंब व नातेवाइकांसाठी दाते सध्या देवदूतच ठरले आहेत. बरेचजण प्लाझ्मासाठी ताटकळत रक्तपेढीच्या बाहेर उभे राहिल्याचे दृश्य नजरेस पडते. आजही प्लाझ्मा रक्तपेढीत एकही दिवस शिल्लक राहिलेला नाही. दररोज प्लाझ्माची गरज वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यभरातून कोरोना रुग्णांचे नातेवाईक रक्तपेढीत विचारणा करत आहेत.
हेही वाचा: लोणावळ्यात १५ दिवसात ५० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करणार
सध्या वीस दाते रोज रक्तपेढीत येत असून चाळीस पिशव्यांचे संकलन होत आहे. नातेवाइक प्लाझ्मा दात्यांकडे डोळेच लावून बसलेले असतात. जवळपास एका दात्याला त्याची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत पाच तासाचा अवधी लागतो. सात ते आठ तपासण्या झाल्यानंतर एका तासात प्लाझ्मा जमा करून घेतला जातो. सध्या बरेच युवावर्ग प्लाझ्मादान करण्यासाठी एकमेकांना स्फूर्ती देत आहेत. शिबिरे भरवली जात आहेत. सोशल मीडियावर खास प्लाझ्मासाठी व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय झाले आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा संदेश आला तरी युवावर्ग एकमेकांना माहिती देत आहेत. डोनर शोधण्यासाठी मदत करत आहेत.
युवावर्ग स्वत:हून प्लाझ्मासाठी पुढे येत आहे. सध्या ३० ते ४० कॉल रोज दाते शोधण्यासाठी होत आहेत. आधी शंभर ते दीडशे कॉल करावे लागत असे. परंतु, आता काही जण स्वत:हून रक्तपेढीत प्लाझ्मा देण्यासाठी येत आहेत. ही चांगली बाब आहे. रात्री दहापर्यंत मशिन सुरुच असते. युवावर्गामध्ये सकारात्मक भावना दिसून येते.
- डॉ. तुषार पाटील, रक्तपेढी प्रमुख, वायसीएम रुग्णालय
१२१३ - आतापर्यंत प्लाझ्मादान
४१४ - २०-३० वयोगट
५०० - ३०-४० वयोगट
Web Title: Youth Forefront In Plasma
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..