esakal | आळंदीमध्ये इंद्रायणीच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाईची धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीमध्ये इंद्रायणीच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाईची धडपड

आळंदीमध्ये इंद्रायणीच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाईची धडपड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळंदी : मावळ भागात सुरू असलेला पाऊस आणि ओढ्या नाल्याद्वारे वाहून आलेल्या पाण्यामुळे आळंदीतील इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाढलेल्या पाण्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू आहे. नागरिक पाण्यात जात असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण वाढला आहे. मात्र, पालिकेची कोणतीही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत नसल्याचे चित्र आहे.

गेली दोन दिवस मावळ भागात पावस जोरात सुरू आहे.परिणामी अळंदीतील इंद्रायणीचे पाणी वाढले. दोन्ही काठावरील दगडी घाट पाण्याखाली असून भक्ती सोपान पुलाला पाणी खेटले आहे. वाढलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील घाणीचा तसेच जलपर्णीचा निचरा होत आहे.

हेही वाचा: ई- वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना मिळणार आर्थिक सवलत

दरम्यान, पुराच्या पाण्यात सेल्फी घेण्यासाठी तरुणाइची धडपड सुरू आहे. अनेकजण पाण्यात जाऊन सेल्फी धोकादायक अवस्थेत घेत आहेत. अशा उत्साही तरुणांवर अवर घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद बोराटे यांनी केली.

loading image