

Shaina NC Tears Balasaheb Thackeray's Photo During Protest, Tries to Cover Up Mistake
esakal
Balasaheb Thackeray Photo Controversy: शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एक अनपेक्षित प्रकार घडला. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या मजकुरावर आक्षेप घेत त्याचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सोनिया गांधी यांचा फोटो फाडताना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून अनवधानाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडला गेला.