
Bollywood News : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजच्या निर्मितीतील ‘१२० बहादूर’ या युद्धपटाचा दुसरा टीझर लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आला आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धातील शौर्यगाथाआणि बलिदान यांवर आधारित हा चित्रपट आहे. पहिल्या मोशन पोस्टरनंतर प्रदर्शित झालेला हा टीझर अधिक रोमांचक आणि प्रभावी आहे.