
Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी प्रयत्न करतेय आणि स्टार प्रवाहला टक्कर देण्यासाठी झी मराठी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतेय. ही मालिका आहे कमळी. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण आता या मालिकेतून एक बॉलिवूड अभिनेत्री मराठीत पदार्पण करतेय.