
Marathi Entertainment News : महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी दादासाहेब फाळके फिल्मसिटी, गोरेगाव (पूर्व) येथील बॉलीवूड पार्कमध्ये बहुप्रतीक्षित ३६०-डिग्री सिनेमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला फिल्मसिटीच्या एमडी स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापक साजणीकर, बॉलीवूड पार्कचे संस्थापक संतोष मिजगर आणि चिराग शाह यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.