
Bollywood Entertainment News : भारतीय सिनेविश्वातील मानाच्या पाचव्या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारांच्या नॉमिनेशनची घोषणा नुकतीच करण्यात आली. हीरामंडी आणि पंचायत या वेबसिरीज यांना तब्बल 16 पुरस्कारांसाठी नामांकन मिळालं आहे. नामांकन यादीमध्ये या दोन्ही वेबसिरीज आघाडीवर आहेत. तर गन्स अँड गुलाब्सला १२ नामांकने आणि मेड इन हेवन सीझन २ ला ७ नामांकने मिळाली आहेत. याशिवाय, चित्रपटांमध्ये खो गए हम कहांला १४ नामांकने, अमर सिंग चमकीलाला १२ नामांकने आणि कडक सिंगला ११ नामांकने मिळाली आहेत.
राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, करीना कपूर, अनन्या पांडे, दिलजीत दोसांझ, परिणीती चोप्रा यांच्यासह अन्य कलाकारांचा नामांकनांमध्ये विशेष उल्लेख आहे.