साध्या माणसाला अचानक लागली मृत्यूची चाहूल! ८ वाजून १३ मिनिटांनी नेमकं काय घडणार? सुनील बर्वे-ऐश्वर्या नारकर यांची नवी सीरिज

8 Vajun 13 Minute Marathi Web Series: घड्याळातील 'ती' वेळ आणि एका क्षणात बदललेलं आयुष्य; अल्ट्रा झकासची नवी ओरिजिनल वेब सिरीज येतेय.
8 VAJUN 13 MINUTE

8 VAJUN 13 MINUTE

ESAKAL

Updated on

एका साध्या - सरळ प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात अचानक मृत्यूची चाहूल लागली, तर काय होईल? त्या एका क्षणानंतर त्याच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून जाईल का? अशाच रहस्य, भावना आणि थराराने भरलेली नवी अल्ट्रा झकास ओरिजिनल मराठी वेब सिरीज ‘८ वाजून १३ मिनिटे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २९ मे २०२६ ला ही बहुचर्चित सिरीज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून, १५ मे २०२६ ला या वेब सिरीजचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हा पोस्टर एका रहस्यमय आणि भावनिक कथेची झलक प्रेक्षकांसमोर आणते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com