
'कढीपत्ता' हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, त्यात भूषण पाटील मुख्य भूमिकेत आहे. युवान प्रोडक्शन निर्मित आणि स्वप्नील युवराज मराठे आणि विश्वा दिग्दर्शित हा चित्रपट एक संगीतप्रधान प्रेमकथा आहे. यात अक्षय टांकसाळे, संजय मोने, शुभांगी गोखले, गार्गी फुले, आनंदा कारेकर, गौरी सुखटणकर यांसारखे अनुभवी कलाकार आहेत. सोबतच आनंद इंगळे आणि चेतना भट हे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.