

priya bapat
esakal
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट ही प्रेक्षकांची आवडती आहे. मराठीसोबतच तिने हिंदीमध्येही आपलं स्थान निर्माण केलंय. तिच्या अभिनयाच्या जोरावर ती मराठी इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रीनपैकी एक बनलीय. नुकताच तिचा 'असंभव' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात ती अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सचित पाटील याच्यासोबत दिसली. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियाने अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतीत तिने तिच्या नवीन घराबद्दलचा सांगितलेला एक अनुभव आता व्हायरल होतोय. आपल्या नवीन घरात आपली आई आपल्या भेटीला येते असं ती म्हणालीये.