

CYLI KHARE
ESAKAL
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगायला शब्द कमी पडतील. राजाची इतकी महती, इतका मोठा पराक्रम लहान मुलांना कसा सांगायचा असा प्रश्न पडतो. शाळेत महाराजांचा इतिहास शिकवला जातो. मात्र त्याही आधी दिवाळीला घरोघरी महाराजांचे किल्ले बनवायला आपण शिकतो. महाराज कसे होते असा प्रश्न अनेकद विचारला जातो. लहान मुलांकडून हा प्रश्न आला तर काय उत्तर द्यायचं? लोकप्रिय गायिकेला देखील तिच्या भाचीने हाच प्रश्न विचारला. कसे होते महाराज? त्यावर तिने थेट गाणंच बनवलं. ही गायिका म्हणजे लोकप्रिय लेखिका, गायिका, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शिका असलेली सायली खरे आहे.