Rucha Mahamuni Debuts in Marathi Cinema: ऋचा महामुनीचा आवाज आता मराठी चित्रपटामध्ये
Marathi Cinema: ऋचा महामुनीने ‘सत्यभामा’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनात पदार्पण केलं आहे. संगीताची परंपरा लाभलेल्या ऋचाचा आवाज लवकरच रसिकांच्या मनात घर करेल.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवनवीन कलाकार आणि दिग्दर्शकांची फळी उभी राहात आहे. त्याचप्रमाणे नवनवीन गायक आणि गायिकादेखील मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. ऋचा महामुनी ही त्यापैकीच एक गायिका.