
sanjay mishra
esakal
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते संजय मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र या वेळी त्यांच्या नव्या चित्रपटामुळे नव्हे, तर वैयक्तिक गुंतवणुकीमुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. संजय मिश्रा यांनी नुकताच मुंबईतील मढ आयलंड परिसरात समुद्राकाठी असलेला आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी केलेल्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले.