
ashi hi banwabanvi lilabai kalbhor
esakal
मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जाणारा चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटातील डायलॉग, गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत. चित्रपटातील कलाकारांनी तर या चित्रपटाला चार चांद लावले. आजही टीव्हीवर हा चित्रपट मोठ्या आवडीने पाहिला जातो. मात्र या चित्रपटातील काही कलाकार सध्या आपल्यात नाहीत. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, सुशांत रे यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र या चित्रपटातील आणखी एक कलाकार आहे ज्यांनी या चित्रपटासाठी मोठं योगदान दिलं आणि त्या आता या जगात नाहीत. त्यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्णच राहिला असता. मात्र त्यांच्याबद्दल फार कमी बोललं जातं. त्या म्हणजे अभिनेत्री नयनतारा.