
गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, आपल्याला घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे कृतज्ञतेने पाहण्याचा दिवस आहे. प्रत्येक कलाकाराच्या वाटचालीत कुणीतरी एक असतो जो त्याला केवळ अभिनय शिकवत नाही, तर आयुष्य जगण्याची दृष्टी देतो.