

ARBAAZ PATEL DHANSHREE VERMA
ESAKAL
'बिग बॉस' हा कार्यक्रम सर्व भाषेत प्रचंड लोकप्रिय आहे. मग तो हिंदी असो किंवा अमराठी, तामिळ असो किंवा कन्नड. मात्र सध्या 'बिग बॉस'च्या घरासारखीच संकल्पना असलेला शो 'राइज अँड फॉल'देखील प्रचंड चर्चेत आहे. या कार्यक्रमात अर्जुन बिजलानी, आदित्य नारायण, युजवेंद्र चहलची एक्स पत्नी धनश्री वर्मा, अनया बांगर हे खेळाडू आहेत. मात्र यात सगळ्यात जास्त चर्चा रंगलीये ती अरबाज पटेल याची. अरबाजने मराठी 'बिग बॉस' मध्ये आपली छाप पाडली. घरात त्याची आणि निक्की तांबोळी यांच्यात जवळीक पाहायला मिळाली होती. मात्र आता प्रेक्षकांना एक वेगळंच चित्र दिसतंय. जे पाहून प्रेक्षक त्याला ट्रोल करत आहेत.