ABIR MARATHI MOVIE STORY
esakal
ABIR MARATHI FILM CAST AND DIRECTOR DETAILS: स्त्रीच्या सौंदर्याभोवती समाजाने अनेक चौकटी आखून ठेवल्या आहेत. तिचा रंग, चेहऱ्याची ठेवण, शरीरयष्टी अशा बाह्य गोष्टींवरून तिचं सौंदर्य ठरवलं जातं. या ठराविक व्याख्यांमध्ये न बसणाऱ्या स्त्रियांना अनेकदा भेदभावाचा सामना करावा लागतो. याच विचारसरणीला प्रश्न विचारत स्त्रीचा आत्मसन्मान, तिचा संघर्ष आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन ‘अबीर’ या मराठी चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. सुदेश वसंतराव झावरे पाटील निर्मित या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन आकाश विष्णू शिंदे यांनी केलं आहे. पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले आणि अविनाश नारकर यांच्या यात भूमिका आहेत. तर शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. येत्या १८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने दिग्दर्शक आकाश विष्णू शिंदे यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.