

ARCHANA PATKAR
ESAKAL
'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय ठरलेल्या कांचन आजी म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनंजिंकली. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केलंय. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्याकडे काम नव्हतं. पैसे नव्हते. नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अर्चना यांनी मराठी इंडस्ट्रीमधील परिस्थिती सांगितली आहे. सोबतच आपल्या कठीण काळाबद्दल भाष्य केलंय.