

AAI KUTHE KAY KARTE WRITER REMOVED
ESAKAL
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड मोडले. ही मालिका लिहिण्यासाठी सुरुवातीला लोकप्रिय लेखिका आणि गीतकार रोहिणी निनावे यांना सांगण्यात आलं होतं. त्यांनी ‘घरकुल’, ‘अवंतिका’, ‘अवघाचि संसार’, ‘ऊन पाऊस’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘कळत नकळत’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांचं लेखन केलं आहे. मात्र अवघे ९ भाग लिहून झाल्यानंतर त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता एका मुलाखतीत त्यांनी तेव्हा नेमकं काय घडलेलं हे सांगितलंय.