

aai kuthe kay karte actress
esakal
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांना आईचं प्रेम आणि तिची किंमत दोन्हीही शिकवलं. कुटुंब हे आईच बांधून ठेवते तिची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही हे दाखवून दिलं. या मालिकेवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने आईची भूमिका साकारली होती. मात्र तिच्या आधी एका अभिनेत्रीला या मालिकेतील भूमिकेसाठी ऑफर आली होती. तिचं सिलेक्शनही झालं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी तिला अचानक काढून टाकलं. ही अभिनेत्री होती 'कमळी' फेम सुषमा मुरुडकर.