AAMCHYA LADKYA NAIKBAI
esakal
AISHWARYA NARKAR COMEBACK SERIAL LATEST NEWS: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आमच्या लाडक्या नाईकबाई' ही Off Air होणार असल्याचं बोललं जातय. ४ महिन्यापूर्वी म्हणजेच १० ऑगस्ट २०२६ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. इतक्या दिवसांनी पुन्हा ऐश्वर्या नारकर कमबॅक करत असल्याने अनेकांना या मालिकेबाबत अपेक्षा होती. सुरुवातीला ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित होत होती. परंतु अचानक या मालिकेची वेळ बदलून दुपासचा स्लॉट देण्यात आला आहे. परंतु आता सोशल मीडियावर आता एक पोस्ट व्हायरल होतोय. त्यात 'आमच्या लाडक्या नाईकबाई' ही मालिका संपणार असल्याचं बोललं जातं.