
Marathi Entertainment News : २००७ मध्ये प्रचंड यश मिळवलेली 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वेल 'सितारे जमीन पर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या पार्श्वभूमीवर आमिर खानने आपल्या निवासस्थानी एक खास म्युझिकल नाईटचे आयोजन केले, जी सर्वार्थाने अविस्मरणीय ठरली.