Bollywood News : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिर खानने तो मराठी भाषा का शिकला यामागचं कारण सांगितलं. काय म्हणाला आमिर जाणून घेऊया. .आमिरने नुकतीच मॅशेबल इंडियाच्या द बॉम्बे जर्नीला मुलाखत दिली. यावेळी त्याला तो मराठी भाषा का शिकला याच कारण सांगितलं. तर त्याच्या मुलांनी त्याच्यामुळे मराठी शिकणं सोडलं असं त्याने सांगितलं. .आमिर म्हणाला की,"मी 44 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला माझी जी मातृभाषा आहे उर्दू जी वाचता,लिहिता येत नाही फक्त बोलता येते. जी माझी राज्यभाषा आहे मराठी ती मला बोलता आणि लिहिता येत नाही. फक्त समजते. ती माझ्यासाठी खूप शरमेची गोष्ट होती. तेव्हा मी ठरवलं की मराठी शिकायचं. त्यावेळी मी एकट्याने नाही तर आम्ही सगळेजण मराठी शिकणार. म्हणजे मी, किरण,जुनैद आणि आयरा सगळेजण मराठी शिकणार. त्यासाठी मी मराठीचे प्राध्यापक सुहास लिमये याना बोलावलं. पहिल्या दोन दिवसात आयराने शिकणं सोडलं, त्यानंतर जुनैद , आणि शेवटी किरणने सोडलं. पण मी शेवटपर्यंत मराठी शिकणं सुरु ठेवलं. तीन वर्षं मी मराठी शिकलो."."मी आणि सुहास सर सारखे आहोत. त्यामुळे मराठी शिकण्यापेक्षा आम्ही इतर गोष्टींवरच गप्पा मारायचो. म्हणून सगळेचजण कंटाळले. त्यामुळे सगळ्यांनी शिक्षण सोडलं आणि मी शेवट्पर्यंत मराठी शिकलो. मला आता मराठी पूर्ण समजतं. मी थोडकं थोडकं बोलतोही." असं त्याने पुढे म्हटलं. .आमिरचा 20 जूनला सितारे जमीन पर सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात जिनिलिया देशमुखचीही मुख्य भूमिका आहे. .गाडी नंबर १७६०चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.