LAGAAN AAMIR KHAN
esakal
OSCAR NOMINATED LAGAAN COMPLETES 25 YEARS: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या 'लगान' या ऑस्कर नामांकित चित्रपटाला प्रदर्शित होऊन यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून मेलबर्नमध्ये आयोजित होणाऱ्या 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न'च्या १७व्या आवृत्तीत अभिनेता आमिर खानचा विशेष गौरव केला जाणार आहे.