Aamir Khan Retirement: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आपली कामं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. महाभारत सिनेमा बनवणं हे स्वप्न असल्याचं आमिर खाने सांगितलं होतं. यावर तो लवकरच काम सुरु करणार आहे. दरम्यान आमिरने एका मुलाखतीत महाभारत हा शेवटचा चित्रपट असल्याचं म्हटलं. दरम्यान महाभारत चित्रपटानंतर अमिर निवृत्ती घेणार अशी चर्चा रंगली होती.