

AAMIR KHAN ON SACHIN TENDULKAR
ESAKAL
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आमिर खान कधी कुणाचं ऐकून घेत असेल असं मुळीच वाटत नाही पण एकाच व्यक्तीकडून त्याला दोनदा ओरडा पडलेला. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणवल्या जाणाऱ्या आमिर खान याच्याकडून चूक झाली तर त्याला कुणी ओरडावं असा प्रश्नच आहे. मात्र त्याच्याही आयुष्यात एक व्यक्ती होती जी त्याला ओरडायची. ती म्हणजे रीमा कागती. रीमा आमिरच्या 'लगान' चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक होती. त्यानंतर ११ वर्षांनी त्यांनी 'तलाश' या चित्रपटासाठी काम केलं. तेव्हाचा एक किस्सा आमिरने एका मुलाखतीत सांगितला आहे.