बाबुल की दुआए... लेकीच्या लग्नात गाणं गाताना आमिर झालेला भावुक; आयराच्या सासूबाईंनाही विचारला प्रश्न

Aamir Khan: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
aamir khan daughter
aamir khan daughter sakal
Updated on

Aamir Khan Daughter Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्याशी विवाह केला. आयरा आणि नुपूर यांचं लग्न हे अतिशय वेगळं होतं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र आता फादर्स डेच्या निमित्ताने आयराने वडिलांचा एक कधीही न पाहिलेला व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला. हा व्हिडिओ तिच्या संगीत सोहळ्यातील आहे. या व्हिडिओत त्यांचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे. तर आमिर लेकीसाठी गाणं गाताना दिसतोय.

लेकीसाठी आमिरचं गाणं

या व्हिडिओमध्ये आमिर आपल्या मुलीबद्दल बोलताना दिसतोय. मात्र त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओत आमिर लाडक्या लेकीसाठी 'बाबुल की दुआए लेती जा' हे गाणं गाताना दिसतोय. सुरुवातीला आमिर आयरा कशी मुलगी आहे हे सांगताना दिसतोय. ती भरभर मोठी झाली असं तो म्हणतो. त्यानंतर किरण राव आणि आमिर यांचा मुलगा आजाद हा बहीण आयरासाठी 'एक हजारो में मेरी बेहेना हैं' हे गाणं गातो. त्यानंतर आमिर मुलीसाठी 'बाबुल की दुआएं लेती जा...' हे गाणं गातो. हे गाणं ऐकून आयरा प्रचंड भावुक होते.

लेकीच्या सासूला विचारला प्रश्न

तर हे गाणं गात असताना आमिर आयराच्या सासूबाईंनादेखील प्रश्न विचारतो. प्रीतम ताई आमच्या मुलीला सासरी प्रेम मिळेल ना? असा प्रश तो त्यांना विचारतो. गाणं संपल्यावर सगळेच एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर सगळेच भावुक झालेले दिसतात. आयराने शेअर केलेला झा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओचं भरभरून कौतुक करताना दिसतायत. तुला खूप चांगले वडील भेटले आहेत आयरा अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय.

aamir khan daughter
मला ती नकोच... मॅनेजरचा आगाऊपणा मराठी अभिनेत्रीला नडला; अनुराग कश्यपने थेट सिनेमातूनच काढलं, नेमकं काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com