
Marathi Entertainment News : २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सितारे ज़मीन पर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रतीक्षेत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘तारे ज़मीन पर’ या सर्वांच्या मनाला भिडलेल्या चित्रपटाचा हा एक आध्यात्मिक सिक्वेल आहे. आधीच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने हृदयस्पर्शी कथा, प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेली एक अद्भुत झलक दाखवली होती, आणि आता या चित्रपटाचं संगीत देखील प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.