आमिर खानचा चर्चेत असलेला चित्रपट 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. टिंगू बास्केट बॉल कोचच्या अभिनयात आमिर खान पहायला मिळणार आहे. यामध्ये आमिर खान दिव्यांग खेळाडूंना शिकवताना दिसणार आहे. परंतु आमिर खान या चित्रपटामुळे सध्या ट्रोल होताना दिसत आहे. या चित्रपटात एका इंग्रजी चित्रपटाची कॉपी केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.