

ketkai and rohan on leena bhagwat video
esakal
रंगभूमीवर जोरदार सुरू असलेलं नाटक 'आमने सामने' च्या निर्मात्या आणि कलाकारांमधील वाद आता आणखीनच चिघळल्याचं दिसतंय. नाटकातील अभिनेते केतकी विलास आणि रोहन गुजर यांनी आपल्याला मानधनाच्या मुद्द्यावरून तडकाफडकी नाटकातून काढून टाकल्याचं म्हटलं होतं. त्यावर लीना भागवत यांनी त्यांची बाजू मांडत मानधनात तिसऱ्यांदा वाढ करणं शक्य नसल्याचं सांगितलं. आता त्यावर केतकी आणि रोहन यांनी काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेच आहे असं म्हणत पुन्हा एकदा त्यांची बाजू मांडलीये. ही मानधनवाढ त्यांच्या आठ वर्षाच्या कामातली तिसरी वाढ असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी काही मेसेजदेखील वाचून दाखवलेत.