

ANIBANI
ESAKAL
सध्याच्या मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांच्या पसंतीनुसार एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेषतः दर्जेदार आशय असलेले मराठी चित्रपट आता जागतिक स्तरावर डिजिटल माध्यमांतून उपलब्ध होत आहेत. याच मालिकेत, लेखक अरविंद जगताप यांची लेखणी लाभलेला आणि दिनेश जगताप यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘आणीबाणी’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जर तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात पाहू शकला नसाल, तर आता 'प्रसार भारती'च्या नव्या 'वेव्हज' (Waves) ओटीटी चॅनलवर तो पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.